अचूकता वैज्ञानिक प्रयोगांच्या यशस्वितेचा पाया आहे. प्रत्यक्ष प्रयोगाची मांडणी, घेतलेली निरीक्षणे, त्यांची नोंद व शेवटी केलेले गणित, हे सर्व घटक काळजीपूर्वक हाताळले तरच उत्तर विश्वासार्ह येते. अचूकतेची उभारणी आणि वैज्ञानिक प्रगती या दोघांचा प्रवास समांतर आहे. १९५०नंतर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सुरू झालेल्या वेगवान प्रगतीने उपकरणे जास्त संवेदनशील, स्वयंचलित झालीत. त्यामुळे अचूक मोजमाप शक्य झालं. किंबहुना अचूकता हाच संशोधनाचा गुणधर्म झाला. या सर्व लक्षणीय प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा आहे तो कम्प्युटरचा.
↧