Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 32

दोन्ही एकच

$
0
0

अचूकता वैज्ञानिक प्रयोगांच्या यशस्वितेचा पाया आहे. प्रत्यक्ष प्रयोगाची मांडणी, घेतलेली निरीक्षणे, त्यांची नोंद व शेवटी केलेले गणित, हे सर्व घटक काळजीपूर्वक हाताळले तरच उत्तर विश्वासार्ह येते. अचूकतेची उभारणी आणि वैज्ञानिक प्रगती या दोघांचा प्रवास समांतर आहे. १९५०नंतर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सुरू झालेल्या वेगवान प्रगतीने उपकरणे जास्त संवेदनशील, स्वयंचलित झालीत. त्यामुळे अचूक मोजमाप शक्य झालं. किंबहुना अचूकता हाच संशोधनाचा गुणधर्म झाला. या सर्व लक्षणीय प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा आहे तो कम्प्युटरचा.

कम्प्युटरमुळेच मानव चंदावर उतरला, जेनोम प्रकल्प यशस्वी झाला, नॅनोसेकंद इतका अतिसूक्ष्म वेळ समजला, इंटरनेट, मोबाइल-मुळे जग सपाट (फ्लॅट) झाले, वैद्यकीय क्षेत्रातील अचूक उपकरणे व औषधे यामुळे मानवी जीवन उंचावले, आयुर्मर्यादा वाढली, जटील गणितीय समीकरणे सोपी झाली, औद्योगिक क्रांतीनंतर संपूर्ण मानवी समाजावर परिणाम करणारे म्हणून, कम्प्युटरचे महत्त्व.

मुंबईतील डबेवाल्याचं उदाहरण घ्या. साडेतीन हजार डबेवाले दीड लाख लोकांपर्यंत दररोज डबा वेळेवर पोचवितात. सिक्स सिग्मा या आधुनिक व्यवस्थापनाच्या प्रणालीत त्यांची कार्यक्षमता ९९.९९९९९९ आहे. याचा अर्थ त्यांचे काम चुकण्याचे प्रमाण दहा लाख डब्यांमागे एक आहे. अचूकतेची शिस्त अंगी बाणलेली, साधारण शिक्षण घेतलेली ही मंडळी एक क्षणही वाया घालवित नाहीत. इंग्लंडचा राजपुत्र चर्चगेट स्टेशनवर भेटला तेव्हाही कोणीही काम थांबविले नाही. ही झाली कर्तव्याची परिसीमा व आपल्या कामावरील असलेली निष्ठा, भक्ती. आईवडिलांच्या सेवेत असताना विठ्ठलाला विटेवर उभा ठेवणारा पुंडलीक, १४ वषेर् वनवासात गेलेल्या प्रभू रामचंदाची वाट पाहणारा भरत ही भक्तीची उदाहरणे. भरत त्या काळात अयोध्येच्या जवळच्या जंगलात राहिला, राजसिंहासन, ऐश्वर्य त्याने उपभोगले नाही. लक्ष्मणासारखा त्याने सर्वस्वाचा त्याग केला नाही. रामाची सेवा म्हणजे आपले कर्तव्य पार पाडणे ही त्याची श्ाद्धा होती. कर्तव्याविना श्ाद्धा निष्फळ हा त्याचा मंत्र होता. राज्यकारभाराची धुरा व्यवस्थित लावून तो अरण्यात राहण्यास गेला. श्ाीराम अयोध्येला परत आल्यावर दोघांची गळाभेट झाली. त्या क्षणी खरा तपस्वी कोण व अरण्यात प्रायश्चित कोणी घेतले हे सांगणे कठीण होते. भरत रामापासून कित्येक योजने दूर होता, परंतु त्याचे मन अहोरात्र श्ाीरामाच्या चिंतनात गुंतले होते. निर्गुणभक्ती ही सगुणभक्तीने काठोकाठ भरली होती. या दोन प्रकारांत फरक तो कुठला? श्ाीरामाचा वियोग विसरण्यासाठी भारताने कामाला वाहून घेतले. भरत निर्गुण भक्त होता, मात्र प्रभूच्या खडावा डोक्यावर ठेवणारा तो सगुण भक्तही होता.

सगुण आणि निर्गुण एकमेकात गुंतलेले असतात. कष्ट म्हणजेच पूजा. मात्र त्यासाठी भावनेचा उबदारपणा हवा, भक्तीचा ओलावा हवा. परमेश्वराची पूजा हा पूजेचा एक भाग झाला; चांगले कर्म करणे हा दुसरा. दोन्ही ठिकाणी भक्तीचे एकनिष्ठ प्रेम हवे. आंतरिक भावना महत्त्वाच्या. कष्ट आणि प्रेम, ज्ञान व भक्ती या एकच असतात; कारण त्यांचा अंतिम उद्देश एकच असतो.

- डॉ. द. व्यं. जहागिरदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 32

Trending Articles