महास्फोटानंतर साडेआठ अब्ज वर्षे इतका काळ पुढे सरकला आणि पृथ्वीनिमिर्तीचे वेध लागले. १.५ अब्ज वर्षांपूर्वी जटील जीवनिमिर्ती शक्य झाली. उत्क्रांती काळासमान पुढे जात होती. चार पायांवर चालणारा होमोनीड, दोन पायांवर उंच उभा झाला. मानवाचं क्षितिज विस्तारलं. त्याच्या मेंदूचं आकारमान याच काळात वाढलं. त्यामुळे त्याची विचारशक्ती, कार्यकारण परंपरा जोखण्याची ताकद वाढली, स्मरणशक्तीचा वरदहस्त मिळाला. या प्रगत मानवाचं पहिलं रूप ६० हजार वर्षांपूवीर् पृथ्वीवर प्रथम संचार करू लागलं. विवेक आणि प्रतिभा यामुळेच मानव डोळसपणे निसर्गाचं आकलन करू लागला.
वीस हजार वर्षांपूर्वी माणूस शिकारी आणि मेंढपाळ होता. १० हजार वर्षांपूर्वी तो प्राणी पाळण्यास शिकला, शेतीचा शोध लागला. मानव स्थिर झाला आणि तेव्हाच मानवी संस्कृतीचा उगम झाला. पृथ्वीच्या निरनिराळ्या प्रदेशांत मानवी वसाहती निर्माण झाल्या. प्रत्येक वसाहतीतल्या विचारवंतांनी चराचर सृष्टीचा विचार सुरू केला आणि चिरंतन शाश्वत मूल्ये सांगितली. चिनी, भारतीय, इजिप्त, ग्रीस, युरोप आफ्रिका या प्रदेशांत राहणाऱ्या मानवाला एक दुसऱ्याच्या अस्तित्वाची जाणीवही नसावी; परंतु प्रत्येक समूहाने शांती, सत्य याबाबत विचार करून सदाचरण, सत्यप्रियता याचा उद्घोष करावा ही विचार करण्याची घटना आहे. याचा अर्थ, सर्वांचं उगमस्थान एकच होते का? अगदी समान विचार सर्वांनाच कसे सुचलेत? हा एक समाजशास्त्रीय प्रश्न आहे. मुख्यत: हे विचार उच्च मानवी मूल्यांची वागणूक सर्वांना सांगतात हाही एक श्रेष्ठ योग आहे.
निसर्गापासून स्वत:चे संरक्षण करण्याची इच्छा असलेला मानव मग मग निसर्गावरच मात करण्याचं स्वप्न पाहू लागला. निसर्गाचं रूप, त्यातील त्रिकालबाधीत नियम त्याला समजू लागले आणि स्वत:ला तो धन्य मानू लागला. काळाचे घटक दिवस व रात्र, तास, मिनिटे, सेकंद हे घड्याळामुळे समजायला लागले. मागील शतकात भौतिक व रसायनशास्त्रातील अचाट प्रगतीमुळे प्रथम मिलीसेकंद, नंतर मायक्रोसेकंद व आता नॅनोसेकंद इतके अतिक्षूक्ष्म कालमापन करता येऊ लागले. महाकाय प्रचंड सूर्य आणि अति सूक्ष्म अणू यांचा अभ्यास केल्याने स्थूल व सूक्ष्म यातील अंतराय समजून आला.
कालमापनाने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीचं वय निश्चित करता आलं. एका शास्त्रज्ञाने खालील शब्दांत ही प्रगती दाखविली आहे.
- डॉ. द. व्यं. जहागिरदार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट