युरोपातही अॅरिस्टाटलचा काळ संपला, रोमचा उदय झाला व ग्रीक संस्कृती मागे पडली. पाचव्या शतकापर्यंत अंधुक, अस्पष्ट ज्ञानप्रकाश होता, त्यानंतर अंधकार सुरू झाला. १२१४ साली रॉजर बेकनने नवज्ञानाची रुजुवात केली. बुद्धीला पटेल तीच गोष्ट सत्य माना. पुराव्याशिवाय विश्वास ठेवू नका अशी वैज्ञानिक दृष्टीची नांदी सुरू केली.
या सर्वांचा अभ्यास करताना जाणवते, की प्राचीन चीन, इजिप्त, ग्रीक संस्कृतीबाबत जशी माहिती उपलब्ध असते तितकी भारतीय शास्त्रज्ञांचं, तत्त्वज्ञानी लोकांचं कार्य पुढे येत नाही. गेल्या ६०-७० वर्षांत मात्र आपले महाभारत, रामायण हे ग्रंथ इलियड, ओडेसीपेक्षा सरस आहेत, हे आपणाला कळू लागले. गीतेत अर्जुनाला श्रीकृष्णाने जे उच्च तत्त्वज्ञान सांगितले, ते वाचून मन थक्क होते. सगुणनिर्गुणा-बाबतचे त्यांचे विचार अंतर्मुख करतात.
अर्जुनाने प्रश्न केला श्रीकृष्णाला. 'काही भक्त तुझे सगुण रूप पाहतात तर काही निर्गुण रूपात तुला ओळखतात. तुला कोणत्या प्रकारचे भक्त जास्त प्रिय आहेत?' भगवान उत्तरले, 'आईला जशी आपली दोन्ही मुले सारखीच आवडतात,तसेच मला सर्व भक्त सारखे वाटतात.' सगुण भक्ती करणारे परमेश्वराला मूतीर्-रूपात पाहतात, निर्गुण भक्ती करणारे संपूर्ण विश्वात त्याचे रूप जाणण्याचा प्रयत्न करतात. दोघेही परमेश्वराला सारखेच. निर्गुणामध्ये सर्व मानवजातीचे कल्याण अपेक्षिले आहे. सवेर्पि सुखिन: संतू। सवेर् संतू निरामय:। सवेर् भदाणि पश्यन्तु। मा कश्चित दु:खमाप्नुयात।। ही वैश्विक दृष्टी व जाण यावी लागते. अशा भक्ताला दुसरे विचार स्पर्शही करत नाहीत. निर्गुण भक्ती कठीण आहे. सगुण भक्ती कोणालाही करता येते, निर्गुणासारखी ती खूप सायास करून मिळविण्याची आवश्यकता नाही. एवढं असले तरी दोन्ही प्रकार सारखेच, कोणताही प्रकार दुसऱ्यापेक्षा श्ाेष्ठ नाही; कारण ते 'भक्ति'ला महत्त्व देतात.
अशी भक्ती, आपल्या कार्या-विषयी, कलेविषयी, ज्ञानाविषयी असल्याशिवाय विश्वाचे आकलन होत नाही. अर्जुनाला माशाचा डोळाच दिसत होता, तितकी एकाग्रता, तन्मयता असल्या-शिवाय आपले इच्छित साध्य होत नाही. उंच शिखरावर जाता येत नाही. प्रयोगशाळेत अहोरात्र काम करणारे शास्त्रज्ञ, तासन् तास संगीताची आराधना करणारे संगीतकार ही सारी झपाटलेली माणसं असतात. हे झपाटलेपण म्हणजेच ज्ञानसाधना.
- डॉ. द. व्यं. जहागिरदार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट