सामान्यपणे सर्वांना हे विश्व कोणीतरी निर्माण केले हे मान्य होते. विश्वाचा हा निर्माता म्हणजे परमेश्वर असं धर्मवेत्ते म्हणतात. शास्त्रज्ञांना मात्र विश्वाला निर्माण करण्यासाठी परमेश्वराची आवश्यकता होती असं वाटत नाही. त्यांच्या मते विश्व स्वयंभू आहे. महास्फोटा-पासून ते पृथ्वीचा गोळा थंड होऊन त्यावर प्राण्यांचं आगमन याचा खोलवर अभ्यास करून एक सुसंगत सिद्धांत शास्त्रज्ञांनी मांडला आहे.
↧