अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाची वाट दाखविली ती रॉजर बेकनने. तो म्हणाला सत्याचा एकच मार्गदर्शक आहे- प्रयोग व त्यातून काढलेले निष्कर्ष. बेकन हा प्रकाशदीप होता, पण अज्ञानाचा अंधार तो दूर करू शकला नाही. अंधाराचे साम्राज्य संपण्यास आणखी दोनशे वषेर् लागली. त्यानंतर १४७३ साली जन्मलेला कोपनिर्कस, शरीरातील रक्ताचा पुरवठा शोधून काढणारा विल्यम हार्वे, ग्रहांची हालचाल नोंदणारा केप्लर, अॅरिस्टॉटलच्या नियमांना खोटे ठरविणारा गॅलिलिओ, या सर्व कर्तृत्वाच्या शिखरावर जाणारा आयझॅक न्यूटन.
↧